Kalapini कलापिनीत नाट्य छटा स्पर्धा उत्सहात संपन्न

एमपीसी न्यूज : कलापिनी (Kalapini) तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातील नाट्य छटा स्पर्धांच्या आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते. जवळपास 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.

5 वर्ष ते 75 वर्ष अशा सर्व वयोगटातील स्पर्धक यात सहभागी होते. प्राथमिक गटासाठी डॉ.ऋचा पोंक्षे आणि मीरा भरड यांनी परीक्षण केले. तर, माध्यमिक आणि खुल्या गटासाठी डॉ.ऋचा पोंक्षे यांच्या बरोबर शोभा जोशी आणि सागर यादव यांनी परीक्षण केले.

दोन्हीही स्पर्धांचे सूत्रसंचालन नीता धोपटे, ज्योती ढमाले, केतकी लिमये, मीरा कोंहुर यांनी केले. तर, बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन आरती पॉलावर आणि अनघा कुलकर्णी यांनी केले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्यावसायिक ऋषिकेश कुलकर्णी आणि गंगाराम गीते तसेच वैजयंती गीते हे उपस्थित होते.

ऋषिकेश कुलकर्णी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत. मी सुद्धा कलापिनितच घडलो, असे सांगितले. मुलांना पुढील वाटचालीसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी कलापिनीसारखी संस्था खूप महत्त्वाचे काम करते, असे सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.

गंगाराम गीते यांनी प्रत्येकाच्या जीवनात भगवंताचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे असते. नामस्मरण करणे, प्रार्थना करणे या मूळे कोणतेही काम व्यवस्थित होते, असे सांगून उद्बोधक अशी गोष्ट पण सांगितली. तसेच, कलपिनीच्या कलाकार घडविण्याच्या कार्याची प्रशंसा केली. डॉ.अनंत परांजपे यांनी स्पर्धेच्या आधी घेतलेल्या कार्यशाळेला मुले उपस्थित राहिल्यामुळे त्यांना नाट्य छटा करताना त्याचा खूप फायदा झाला, असे नमूद केले. तसेच, आगामी होणाऱ्या नाट्य वाचन स्पर्धेत सहभागी (Kalapini) होणाऱ्या सगळ्यांनी 11 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या नाट्य वाचन कार्यशाळेत जरूर सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘स्पर्धकांनी खूप चांगली तयारी केली आणि विषय पण खूप वेगळ्या प्रकारचे होते’, त्याबद्दल मान्यवर परीक्षकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा सत्कार अंजली सहस्रबुद्धे यांनी केला. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख अशोक बकरे यांनी केले.

स्पर्धा सुनियोजित आणि यशस्वी होण्यासाठी अनघा बुर्से, श्रीपाद बूर्से, दीप्ती आठवले, किसन शिंदे, दीपक जयवंत, सायली रौधळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

गट 5वी ते 7वी : (Kalapini)

प्रथम – श्रेया साळुंके, इ.6 वी, सह्याद्री इं स्कुल.
द्वितीय -चिन्मय फल्ले
तृतीय – ऋग्वेद अरणके

उत्तेजनार्थ:

अनिशा गायकवाड, इ. 5 वी ब
श्रीमय अमित कुलकर्णी, इ.7वी, जैन इं
श्रावणी बसप्पा हेळकर, इ.7वी, ॲड.पु.वा.प
मुक्ता पोफळी, इ.5वी, डी वार पाटील स्कुल.
वेदांत हेमंत उदास, इ. 7ब, आदर्श वि.मं.

गट : आठवी ते दहावी :

प्र.जान्हवी श्रावण महाजन, प्रगती वि म इंदुरी
द्वि.वैष्णवी बाळकृष्ण धरकुडे, 9वी, इंद्रायणी.
तृ.गार्गी अशोक काळे, 8अ, कृ.भेगडे इं. स्कुल,

उत्तेजनार्थ:

शौनक जाधव, 8 वी अ, मामासाहेब खांडगे स्कूल
जिया विशाल लोंढे, 8 वी, इंद्रायणी इं. स्कुल,
नंदिनी बापुराव कांगणे, प्रगती वि मं.इंदुरी.

गट- खुला

प्रथम: धनश्री जितेंद्र कांबळे,
द्वितीय: रविंद्र पांढरे,

उत्तेजनार्थ : 
योगेश प्रकाश वैद्य व अविनाश शिंदे.

Today’s Horoscope 08 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.