Kalapini Talegaon : कै. पद्माकर प्रधान स्मृती पुष्प सुगम संगीत स्पर्धा 2022 उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे येथील कलापिनी तर्फे गेली 46 वर्षे सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलापिनीच्या कै.पद्माकर प्रधान सुगम संगीत स्पर्धा आयोजत केली जाते. (Kalapini Talegaon) यंदा ही 5 ते 75 वर्षांच्या स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दिव्यांग मुलांचाही उत्साही सहभाग घेतला होता.

या वर्षीच्या स्पर्धांना पण असाच प्रचंड प्रतिसाद मिळाला प्राथमिक फेरीत 200 स्पर्धकांचा सहभाग होता. प्राथमिक फेरीसाठी विनय कशेळकर व शर्मिला शिंदे,मोनिका काकडे (किंबहुने) व आशुतोष सुरजुसे यांनी परीक्षण केले तर यशश्री जोशी व श्रीनिधी गोडबोले यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले.(Kalapini Talegaon) शिशु गट, लहान गट व ज्येष्ठ गट, इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, युवक गट आणि प्रौढ गट अश्या विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गटातील 20 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. ह्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष लायन मयूर राजगुरव व त्यांच्या पत्नी लायन अक्षता राजगुरव लाभले होते. त्याचबरोबर लायन डॉ. सचिन पवार,कलापिनीचे  अध्यक्ष विनायक अभ्यंकर,  उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख अशोक बकरे,  कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे, कलापिनी चे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे हे ही उपस्थित होते.

Cycle competition : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेला प्रतिसाद

अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले, संपदा थिटे यांनी स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना गुणवत्ता वाढीसाठी पुढील वर्षी पासून पात्रता फेरी घेण्यात यावी असे सुचवले.(Kalapini Talegaon) आपल्या मनोगतात परीक्षकांनी,  उत्तम सादरीकरण केल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे खूप कौतुक केले, तसेच गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले. या स्पर्धांमध्ये प्रदीप जोशी, संपदा थिटे, प्रिया करंदीकर घारपुरे आणि ओंकार बोऱ्हाडे.(संवादिनी) सिंथेसायजर नचिकेत संत, मंगेश राजहंस, दीपक आपटे आणि चैतन्य लोवलेकर(तबला) तर प्रवीण ढवळे आणि अनिरुद्ध जोशी (तालवाद्य) यांच्या साथ संगतीने रंग भरला. प्राथमिक फेरीचे सूत्र संचालन दिपाली जोशी , ज्योती गोखले,केतकी लिमये यांनी केले.

कलापिनी कुमार भवनच्या श्रीमय कुलकर्णी आणि ओवी पाचलग ह्या दोन छोट्या दोस्तांनी अंतिम फेरीतील छोट्या गटाचे तर कलापिनीची युवा कलाकार पूजा डोळस ने युवा व प्रौढ गटाचे अभ्यासपूर्ण सूत्र संचालनामुळे व सुमेर नंदेश्वर यांचे उत्तम ध्वनी संयोजनाने अंतिम फेरीची लज्जत वाढवली.(Kalapini Talegaon) आभार प्रदर्शन डॉ. विनया केसकर ह्यांनी केले. कलापिनी च्या सर्व युवा आणि जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उत्तम टीमवर्क आणि आयोजनामुळे स्पर्धा खूप छान झाल्या.

 

स्पर्धेचा निकाल

शिशू गट.   1 ली 2 री.

प्रथम – शांभवी सागर धर्माधिकारी, इ.2 री,  बालविकास विद्यालय, द्वितीय – ओवी सुचित आल्हाट, इ. 1 ली  जैन इं. स्कूल. तृतीय – आयुष विश्वनाथ मोरे, इ.2 री सरस्वती वि. मं. इंदोरी, मावळ.

लहान गट – इ.री, 4 थी

प्रथम – विवान रुपनवर.इ.4 थी,हचिंग स्कूल, द्वितीय –  अंतरा सम्राट काशीकर, इ.3 री,  सरस्वती वि.मं., तळेगाव दाभाडे, तृतीय – सार्थक फुलाजी गायकवाड,इ.4 थी सह्याद्री इं. स्कूल.

जेष्ठ गट ( वय 60 चे पुढे )

प्रथम – श्री. संजय देशपांडे, द्वितीय – डॉ. अश्विनी अनंत परांजपे, तृतीय –  सुमित्रा तांबे

किशोर गट 5 वी ते 7 वी. :-

प्रथम – वैष्णवी शर्मा, इ.6 अ, मामासाहेब खांडगे स्कूल, द्वितीय – आयुष अमोल काकडे, इ.7वी, कृष्णराव भेगडे इं. स्कूल, तृतीय – रुद्र उमेश वैरागी, इ.5 वी आदर्श विद्या मंदिर.

कै.दादा चांदेकर स्मृती करंडक.. प्रतिभाशाली कलाकार पुरस्कार मानकरी

कु.ग्रंथाली मोहोळ, हाय व्हिजन स्कूल.

कुमार गट:- प्रथम. – उत्तरा फाकटकर, इ. 10 वी, ॲड.अण्णासाहेब चोभे हायस्कूल, द्वितीय – आदित्य विलास जावळेकर,इ.9 ब, ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर, तृतीय – अद्वय प्रसाद मुंगी, इ.8 वी जैन इं स्कूल.तळेगाव दाभाडे.

प्रौढ गट:-

प्रथम. –  डॉ.प्राची पांडे,

द्वितीय – कविता ठाकूर,

तृतीय – अंकुर भारतकुमार शुक्ल,

 

युवक गट:-

प्रथम. – सोजी  मॅथ्यू,

द्वितीय – धनश्री शिंदे,

तृतीय – ऋतुजा अनिकेत शेलार,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.