Kalewadi : कोयत्याने वार करत तरुणावर टोळक्याचा जिवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – कोयत्याने वार करत 25 वर्षीय तरुणावर (Kalewadi) पाच ते सहा जणांच्या टोळक्याने जिवघेणा हल्ला केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25) मध्यरात्री काळेवाडी येथे घडला आहे. 

या प्रकरणी मंदार सुनिल कुशे (वय 25 रा.गिरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तापकीर चौक येथील इडली-डोसा विकणार्‍या पाच ते सहा इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खाण्याचे पार्सल घेण्यासाठी जात होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी संघर्ष चंदनशिवे याच्या वडिलांना आरोपींनी विनाकारण मारहाण केली होती. त्यानंतर फिर्यादी त्याच रस्त्याने जात असताना आरोपीला फिर्यादी हे संघर्ष याचा मित्र असल्याचा संशय आला.

त्य़ांनी फिर्यादीला आडवले व आज याला सोडायचा नाही म्हणत कोयत्याने डोक्यावर मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातात कोयते फिरवत नागरिकांमध्ये ही दहशत निर्माण केली. या प्रकऱणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून वाकड पोलीस याचा पुढील तपास करत (Kalewadi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.