Kalewadi Accident News : भरधाव दुचाकीची पथदिव्याच्या खांबाला धडक; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची पथदिव्याच्या खांबाला धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना काळेवाडी उड्डाणपुलावर शनिवारी (दि. 17) रात्री घडली.

पंकज इशप्पा देसाई (वय 27) आणि राहुल सिद्धराम देसाई (वय 25, दोघेही रा. गुजरनगर, थेरगाव) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी सौदागर देवीदास लामतुरे यांनी रविवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मयत पंकज आणि राहुल थेरगाव येथून जगताप डेअरीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी भरधाव वेगात जात होती. काळेवाडी उड्डाणपुलावर दुचाकी आली असता चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलावरील विद्युत खांबाला जाऊन धडकली.

या अपघातात पंकज आणि राहूल हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.