Kalewadi Crime News : समाजकार्याचा राग मनात धरून मारहाण ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – समाजकार्य करत असल्याचा राग मनात धरून पाच जणांच्या टोळक्याने एका इसमाला मारहाण केली. जय भवानी चौक, काळेवाडी याठिकाणी (शुक्रवारी, दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

प्रमोद दयानंद कांबळे (वय 19, रा. रहाटणी, वाकड) व ओंकार बाळु बोरेकर (वय 21, रा. जय भवानी चौक, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, महेश माने, राहुल मोरे व रोहित शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अक्षय शिवाजी सोंडकर (वय 28, रा. रहाटणी, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करत असलेल्या समाजकार्याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून त्यांना मारहाण केली. कोयता, दांडक्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.