Kalewadi Crime News : कार थांबवण्यास सांगितल्याने पोलिसासोबत हुज्जत घालणाऱ्या चालकासह दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कार वेडीवाकडी आणि भरधाव वेगात चालविल्याने कारला थांबवण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत चालकाने हुज्जत घातली. तसेच अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत कार चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (दि.13) रात्री पावणेबारा वाजता भारतमाता चौक ते तापकीर मळा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी बालाजी संतराम वालेकर (वय 24, रा. पाचपीर चौक, काळेवाडी), तुषार लहू कोकणे (वय 28, रा. कोकणे नगर, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई विक्रांत चव्हाण यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपी कारमधून (एम एच 14 / जे एच 0202) भारतमाता चौक ते तापकीर मळा चौकाकडे जाणा-या रोडवर काळेवाडी येथून जात होते. कार भरधाव वेगात आणि वेडीवाकडी चालवत असल्याने पोलीस शिपाई चव्हाण यांनी त्यांना थांबण्यास सांगितले.

त्यावरून चिढलेल्या आरोपींनी फिर्यादी पोलीस शिपाई चव्हाण यांना अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.