Kalewadi Crime News : सहा महिन्यांपासून फरार व तडीपार असलेल्या दोघा भावंडांना अटक

खंडणी / दरोडा विरोधी पथकाची कारवाई ; 2 पिस्टल व 4 जिवंत काडतूस जप्त

एमपीसी न्यूज – सहा महिन्यापासून फरार असलेल्या फरार व तडीपार असलेल्या दोन सख्या भावंडांना 2 पिस्टल व 4 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. खंडणी / दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि.1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली.

मयुर अनिल घोलप (वय 27), विकी अनिल घोलप ( वय 23, दोघे रा. पागेची तालीम, चिंचवडगाव) अशी अटक केलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 80 हजार 800 रुपये किंमतीची दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्यात आले होते.

फरार व तडीपार आरोपींच्या माहितीसाठी पेट्रोलिंग करीत असताना हे दोन्ही आरोपी ज्योतीबा गार्डन, पवनानगर, काळेवाडी याठिकाणी पिस्तुल घेऊन उभे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी / दरोडा विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी / दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ , पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील , शाकीर जिनेडी, तसेच पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, गणेश हजारे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे, किरण काटकर गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, प्रदीप गोडांबे, निशांत काळे, आशिष बोटके, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.