kalewadi Crime News : काळेवाडीत बसच्या धडकेत पादचारी ठार

एमपीसी न्यूज – काळेवाडीत बसच्या धडकेत 40 वर्षीय  पादचारी   इसमाचा मृत्यू झाला. काळेवाडीतील मुख्य रस्त्यावर, प्रेरणा बँकेसमोर शनिवारी (दि. 06) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

किरण साहेबराव मेंढेकर (वय 40) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी भाग्यश्री किरण मेंढेकर (वय 37, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एमएच 12 एचबी 0669 या बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे काळेवाडी रस्त्यावरून एमएम चौकातून तापकिर चौकाकडे पायी चालत जात होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या एमएच 12 एचबी 0669 बसने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या किरण यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.