Kalewadi : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले ? – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज – मागील निवडणुकीत भाजपाने छत्रपतीं शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेंब आंबेडकर यांच्या स्मारकांचे भूमिपूजन केले त्याचे काय झाले ? त्या स्मारकाला अजून एक वीट बसविली नाही. मोदींनी केलेल्या या फसव्या योजनांचे काय झाले असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. काळेवाडी येथे पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार प्रकाश गंभिजे, सुषमा अंधारे, सलक्षणा सलगर उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, पंधरा लाख रुपये, अच्छे दिन, दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार याचे काय झाले. पंतप्रधान मोदींनी फक्त स्वप्ने दाखविली. मेक इन इंडिया, स्कील इंडिया, फायदा कोणाला झाला आहे हे फक्त सांगावे. पाच वर्षे देशातील जनतेला वेड्यात काढले. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियातून देशाला काय फायदा हे सांगायला हवे पण ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले हे नरेंद्र मोदींनी जनतेला सांगावे.

जयंत पाटील म्हणाले की, पार्थ पवारांसारखा उमदा नेता संसदेत गेला तर विकासाला गती येईल. आघाडीच्या 28 जागा आम्ही जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.