Kalewadi : रिक्षा चोरी करणा-या सराईताला अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – रिक्षा चोरी कऱणाऱ्या सराईत चोराला वाकड पोलिसांनी (Kalewadi) अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन गुन्ह्यांची उकल केली असून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिलीपकुमार शालीग्राम विश्वकर्मा (वय 24 रा. तापकीर नगर,काळेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाहन चो-या करणारा सराईत गुन्हेगार दिलीपकुमार विश्वकर्मा हा काळेवाडी परीसरात येणार आहे. हि बातमी मिळता पोलिसांनी काळेवाडी येथील लकी बेकरी चौकात तेथे सापळा लावला व संशयीत विश्वकर्माला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील 3 रिक्षा चोरी केल्याचे त्याने कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या 6 लाख रुपयांच्या 3 रिक्षा जप्त केल्या. याचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Pimpri : पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून मेडिकलची तोडफोड करत एकावर कोत्याने वार

हि कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (Kalewadi) गुन्हे-1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे-2 रामचंद्र घाडगे, पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार विभीषण कन्हेरकर,सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार बंदु गिरे, संतोष वर्ग, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, पोलीस नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलीस शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे,कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.