Kalewadi : काळेवाडी -पिंपरी व पवनेश्वर- काळेवाडी पूल 23 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

Kalewadi-Pimpri and Pawaneshwar-Kalewadi bridges closed for traffic till July 23

एमपीसी न्यूज – काळेवाडी व पिंपरीला जोडणारा काळेवाडी- पिंपरी पूल (लकी बेकरी जवळचा) आणि पवनेश्वर – काळेवाडी पूल 14 ते 23 जुलैपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मात्र, यामधून पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

त्याची मुदत 23 जुलैला संपत आहे. त्यामुळे काळेवाडी व पिंपरीला जोडणारा काळेवाडी- पिंपरी पूल (लकी बेकरी जवळचा) आणि पवनेश्वर – काळेवाडी पूल 14 ते 23 जुलैपर्यंत सार्वजनिक वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.