Kalewadi news: काँग्रेसतर्फे बुधवारी काळेवाडी येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात रक्ताचा आणि प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे.  या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या (बुधवार) काळेवाडी, पिंपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात विविध ठिकाणी महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहर काँग्रेसच्या वतीने ‘कोविड मदत व सहाय्य केंद्र’ रविवारपासून ‘सज्जी वर्की जनसंपर्क कार्यालय, साई इन्कलेव्ह, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी’ येथे सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी उपस्थित रहावे.

तसेच सर्व फ्रंटल विभाग व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. सर्वांनी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. सोशल डिसटन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असेही आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस सज्जी वर्की यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.