Kalewadi News : काळेवाडीत 101 नागरिकांची मोफत अँटीजेन चाचणी ; 14 जण पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग शहरात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम, काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, अजिंक्य मित्र मंडळ व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोरोना चाचणी शिबिर काळेवाडी, नढेनगर येथे आयोजित करण्यात आले होते.

तपासणीत 101 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 14 नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कोरोना चाचणी बाबत गैरसमजुतीमुळे अनेक जण चाचणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. असे नागरिक सायलेंट कॅरिअर म्हणून काम करतात. त्यामुळे रहिवासी सोसायटीत जाऊन चाचणी करण्याची संकल्पना राबविली जात आहे.

यावेळी ‘पीसीसीएफ’चे धनंजय शेंडबाळे, मुकेश फेरवानी, हृषिकेश तपशाळकर, काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे प्रवीण अहिर, वैभव घुगे, प्रमोद हाटे, सुभाष कांबळे व अजिंक्य तसेच, मित्र मंडळचे बाबासाहेब जगताप, एनबी राणे, सुशील पवार, सुशील जाधव, विलास पवार, सीताराम जगताप व महेश पवार आदींनी उपस्थित राहून शिबिराचे नियोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.