Kalewadi news: पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

एमपीसी न्यूज – काळेवाडी तापकीरनगर परिसरातील येथील परीस कॉलनी एक येथे महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

काळेवाडी तापकीरनगर येथील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. येथे खोदाई करताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली.त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

दरम्यान, वारंवार येथील नागरिकांनी तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी वेळेत पाईपलाईन दुरूस्त न केल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने रस्त्यावर पाण्याचे डबके साचले. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.