Chinchwad – काळेवाडी-पिंपरीगाव जोडणारा पवनेश्वर पूल वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – काळेवाडी आणि पिंपरीगाव या दोन भागांना जोडणारा पवना नदीवरील पवनेश्वर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. थेरगाव परिसरातील पडवळ नगर, सुंदर कॉलनी, गणराज कॉलनी, दगडूपाटील नगर, क्रांतिवीर नगर या भागात कोरोणा विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील काही रस्ते, पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

काळेवाडी आणि पिंपरी या दोन गावांना जोडणारा पवना नदीवरील पवनेश्वर पूल हा सार्वजनिक वाहतुकीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. या आदेशातून अग्निशमन विभाग, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, वैद्यकीय विभागाची वाहने यांना वगळण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.