Stray dogs fear भटक्या श्वानांचा बंदोबस्त मनपाने करावा, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी 

एमपीसी न्यूज : काळेवाडी – रहाटणी या दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. झुंडीझुंडीने फिरणार्‍या  या श्वानांपासून नागरिक आणि लहान मुलांना भीती निर्माण झाली आहे. मोकाट श्वानांनी आतापर्यंत तीन ते चार जणांना चावादेखील घेतल्याची माहिती आहे.(Stray dogs fear) या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केल्या. मात्र, तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, काळेवाडी – रहाटणीच्या गल्लोगल्लीत मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांची दहशत स्थानिक नागरिकांमध्ये पसरली असून, सामान्य नागरिकांचे रस्त्यावर फिरणे अडचणीचे झाले आहे. 10 ते 12 बेवारस श्वानांचे टोळके प्रत्येक चौकात ठाण मांडून असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना या श्वानांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक आपल्या घरातील शिळे अन्न घराबाहेर टाकत असल्यामुळे हे श्वान मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून, जवळून जाणाऱ्या  – येणाऱ्या पादचाऱ्यांवर जोराने भुंकत असतात.

Lonavala fraud : कंपनी मालकाची फसवणूक; बनावट सोन्याच्या विटा, हिरे देत घातला लाखोंचा गंडा

विशेषत: काळेवाडी फाटा ते मदर टेरेसा उड्डाणपूल बीआरटी लेनच्या दुतर्फा श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्योतिबा गार्डनजवळ तर झुंडीच्या झुंडी फिरत असतात. या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येत असलेल्या ज्येष्ठांना, लहान मुलांना या श्वानांचा मोठा धोका आहे.(Stray dogs fear) या रस्त्यावरून ये-जा करताना महिला आणि लहान मुलांना कित्येकदा सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागतो. याबाबत महापालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे. लहान मुले या श्वानांच्या तावडीत सापडताच. त्यांचे हे श्वान चावा घेतात. अनेकदा या श्वानांनी पादचाऱ्यांचा आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धाव घेत पाठलाग केल्यामुळे अपघाताच्या घटना घडल्याने दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

 

त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. भटक्या श्वानांनी हैदोस घातला असताना महापालिकेने घेतलेली बघ्याची भूमिका संतापजनक आहे.उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेतर्फ श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. एका श्वानाच्या निर्बीजीकरणासाठी हजार रुपयांचा खर्च होतो.(Stray dogs fear) मागील दोन वर्षात महापालिकेने निर्बीजीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तथापि, रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने श्वान दिसतात. महापालिकेने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.