Kalewadi : महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी काळेवाडी पिंपरी येथे संपन्न 

एमपीसी न्यूज -जालना येथे होणा-या 62 व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी काळेवाडी पिंपरी येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून पै. संतोष सुरेश नखाते याने पै. शाह फैझल कुरेशी याला चितपट केले. तर गादी विभागात पै. किशोर हिरामण नखाते याने पै. प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळवून आपला प्रवेश निश्चित केला. तसेच जानेवारी 2019 ला मुंबईत होणाऱ्या सीएम चषकसाठी पै. किशोर नखाते व पै. प्रसाद सस्ते यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने काळेवाडी पिंपरी येथे आयोजित करण्यात आली हेाती. यावेळी आखाडा पुजन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली कुस्ती उद्योजक शंकर जगताप यांच्या हस्ते लावण्यात आली. समारोप प्रसंगी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पै. जयराम उर्फ जयवंत बाबूराव नढे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कूस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, ऑलिंम्पिकवीर पै. मारुती आडकर, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संयोजक व ‘ग’ प्रभाग स्विकृत सदस्य विनोद तापकीर, प्रगतीशिल शेतकरी ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, सचिव धोंडीबा लांडगे, खजिनदार दिलीप बालवडकर, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, काळूराम कवितके, आयोजक निलेश तापकीर, भारत केसरी पै. विजय गावडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पंच विजय कुटे, विजय नखाते, मनोज दगडे, बाळासाहेब काळजे, निवृत्ती काळभोर, सुत्रसंचालक हंगेश्वर धायगुडे आदींसह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणी काळेवाडी परिसरातील नामांकित वस्ताद रामतात्या नढे, श्रीराम तात्या कोकणे, चांगदेव आप्पा नखाते, शंकरराव काळे, सुरेश नढे पाटील, महादू कोकणे, महादेव नढे, सयाजी आप्पा नढे, साधू नढे, विजय नखाते (पंच), दिलीप नखाते, शिवराम नखाते, आनंदा काळे, गुलाबराव तांबे, ज्ञानेश्वर ब. नढे, ज्ञानेश्वर बा. नढे, शंकर नखाते, विलास नखाते, हरिभाऊ नखाते, सुदामराव नखाते, कैलास काळे, माऊली काळे, शंकर आप्पा नढे, ज्ञानोबा काळे, दिलीप नढे, कृष्णा तांबे, अजय नढे, शिवराज तांबे, किशोर नखाते, देवा आप्पा नखाते, काळूराम नढे, जगदीश नढे, संतोष सुरेश नखाते, निलेश नखाते, शंकर चांदेरे, लहू कोकणे, काळूराम थोपटे, अरुण तांबे, अजय लांडगे, किरण दे. नखाते, संतोष ना. नखाते, आबा शिंदे यांना कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
स्पर्धेच्या संयोजनात समस्त ग्रामस्थ रहाटणी – काळेवाडी तसेच हनुमंत गावडे, आ. महेश लांडगे, दिलीप बालवडकर, धोंडिबा लांडगे, विजय गावडे, संतोष माचुत्रे, विनोद तापकीर, निलेश तापकीर, पोपटराव फुगे, विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, महाद्रंग वाघेरे, आबा काकडे, राजू जाधव, दिलीप काळे, काळूराम कवितके, सी एम चषकचे संयोजक नगरसेवक अंबरनाथ कांबळे तसेच महेश जगताप, शिवाजी कदम, नवनाथ जांभुळकर, गणेश काशीद आदींनी सहभाग घेतला होता.
विजेत्या मल्लांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॅकसुट बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेस पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी माती विभागातून विजय मिळविलेला पै. संतोष नखाते व गादी विभागातून विजयी झालेला पै. किशोर नखाते हे पुण्यातील वारजे माळवाडी येथील सह्याद्री कूस्ती संकुल येथे वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
कुस्तीचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
कुमार गट (45 किलो) : पै. जाधव वि. वि. पै. प्रणव सस्ते.
कुमार गट (48 किलो) : पै. संकेत माने वि. वि. पै. केदार लांडगे
कुमार गट (51 किलो) : पै. यश कलापुरे वि. वि. पै. कार्तिक लोखंडे
कुमार गट (55 किलो) : पै. महेश जाधव वि. वि. पै. किरण माने
कुमार गट (60 किलो) : पै. समर्थ गायकवाड वि. वि. पै. विनायक वाजे
कुमार गट (65 किलो) : पै. सोहम लोंढे वि. वि. पै. यश नखाते
कुमार गट (71 किलो) : पै. देवांग चिंचवडे वि. वि. पै. सिद्धार्थ लांडे
कुमार गट (80 किलो) : पै. शुभम चिंचवडे वि. वि. पै. रोहित काटे
कुमार गट (92 किलो) : पै. निखिल जगताप वि. वि. पै. अक्षय करपे
कुमार गट (110 किलो) : पै. यश कलाटे वि. वि. पै. प्रतिक चिंचवडे
गादी विभाग खुला गट
गादी विभाग खुला गट (57 किलो) : पै. विशाल सोंडकर वि. वि. पै. कुणाल जाधव
गादी विभाग खुला गट (61 किलो) : पै. दीपक कलापुरे वि. वि. पै. कुणाल कंद
गादी विभाग खुला गट (65 किलो) : पै. योगेश्वर तापकीर वि. वि. पै. परशुराम कॅम्प
गादी विभाग खुला गट (70 किलो) : पै. राजू हिप्परकर वि. वि. पै. रविंद्र गोरड

गादी विभाग खुला गट (74 किलो) : पै. निरंजन बालवडकर वि. वि. पै. पृथ्वी भोईर
गादी विभाग खुला गट (79 किलो) : पै. शुभम गवळी वि. वि. पै. विवेक शेलार
गादी विभाग खुला गट (86 किलो) : पै. प्रसाद सस्ते वि. वि. पै. कुणाल शेवाळे
गादी विभाग खुला गट (92 किलो) : पै. अजिंक्य कुदळे वि. वि. पै. गणेश साळुंखे
गादी विभाग खुला गट (97 किलो) : पै. विपुल वाळुंज वि. वि. पै. हर्षवर्धन माने
गादी विभाग खुला गट (86 ते 125 किलो) महाराष्ट्र केसरी गट : पै. किशोर नखाते वि. वि. पै. प्रमोद मांडेकर
माती विभाग खुला गट
माती विभाग खुला गट (57 किलो) : पै. विनायक नाईक वि. वि. पै. जय वाळके
माती विभाग खुला गट (61 किलो) : पै. चेतन कलापुरे वि. वि. पै. परमेश्वर सोनकांबळे
माती विभाग खुला गट (65 किलो) : पै. शेखर लोखंडे वि. वि. पै. धीरज बो-हाडे
माती विभाग खुला गट (70 किलो) : पै. अविनाश माने वि. वि. पै. वैभव बारणे
माती विभाग खुला गट (74 किलो) : पै. पवन माने वि. वि. पै. अक्षय आढाळे
माती विभाग खुला गट (79 किलो) : पै. ऋषीकेश बालवडकर वि. वि. पै. निखिल नलावडे
माती विभाग खुला गट (86 किलो) : पै. सुरज नखाते वि. वि. पै. अनुराग रासकर
माती विभाग खुला गट (92 किलो) : पै. संकेत धाडगे वि. वि. पै. कमरुद्दीन चौधरी
माती विभाग खुला गट (97 किलो) : पै. कानिफनाथ काटे वि. वि. पै. आदर्श नाणेकर
माती विभाग खुला गट (86 ते 125 किलो) महाराष्ट्र केसरी गट : पै. संतोष नखाते वि. वि. पै. शाह फैझल कुरेशी.
सी. एम. चषक निकाल
57 किलो गट पै. विशाल सोंडकर वि. वि. पै.कुणाल जाधव
65 किलो गट पै. योगेश तापकीर वि. वि. पै. परशुराम कॅम्प
74 किलो गट पै. निरंजन बालवडकर वि. वि. पै. पृथ्वी भोईर
86 किलो गट पै. प्रसाद सस्ते वि. वि. पै. कुणाल शेवाळे
सी. एम. चषक खुला गट पै. किशोर नखाते

 

सी. एम. चषक महिला गट

48 किलो प्रतीक्षा लांडगे वि. वि. सारिका माळी

54 किलो स्वप्नाली काळभोर वि. वि. आरती बांबे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.