Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीने (Kalewadi) रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बीआरटी रोड काळेवाडी येथे घडली.
अरविंद देवराम आरगडे (रा. थेरगाव) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी केली एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अनोळखी व्यक्ती रागा पॅलेस येथे पायी रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव आलेल्या (Kalewadi) दुचाकीने (एमएच 31/सीझेड 2233) पादचारी व्यक्तीस जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीच्या डोक्याला, तोंडाला व अंगाला तसेच इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार अरविंद हा देखील जखमी झाला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.