Kalewadi : खिंवसरा पाटील विद्यामंदिरमध्ये क्रीडा मेळावा

एमपीसी न्यूज -वाकड, थेरगाव, गणेशनगर-खिंवसरा पाटील विद्या मंदिर या शाळेत क्रीडा मेळावा दि. 10 ते 15 डिसेंबर या कालावधीत आय़ोजित केला होता.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीच्या पूजनाने क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन केले. शामला वाघमारे या शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ म्हणून घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मधुकर म्हस्के व पिंपरी चिंचवड महापालिकेचे विश्वास गेंगजे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले व खेळ आणि आपले आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध कसा आहे हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना खेळातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या मेळाव्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी धावणे, डोक्यावर पुस्तक घेऊन चालणे, चमचा लिंबू, बेडूक उड्या, दोरीवरच्या उड्या व लंगडी हे खेळ घेण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोरीवरच्या उड्या, लिंबू चमचा, कबड्डी सामना, खोखो सामना, गोळा फेक हे खेळ घेण्यात आले.विद्यार्थ्यांनी सर्व खेळांच्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला व आनंदाने क्रीडा मेळावा पार पडला.  शनिवार (दि. 15 डिसेंबर) या मेळाव्याचा समारोप झाला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तबला वादक विनोद सुतार व गणेश विभुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे सांगून अधिक प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल असा धीर दिला, असे गणेश विभुते यांनी मत व्यक्त केले.  साक्षी चक्रनारायण या विद्यार्थिनीने इंग्रजीमधून अनुभव कथन केले. तसेच आकांक्षा गायकवाड, सायली पारधे, निशा दिपके, फिरोजशहा या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्पर्धेविषयी, खेळाविषयी काय वाटले व काय काय अनुभव आले याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली.

मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रीडा मेळाव्याचे नियोजन नीता साळवे व सविता पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनम औताडे यांनी केले.  सूत्रसंचालन मंजुषा गोडसे यांनी केले व सीमा आखाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन  पुष्पा जाधव, प्रमिला देशमुख, साक्षी कुरळे व दिपाली नाईक यांनी केली. सुधाकर हांडे, संदीप बरकडे, शितल गायकवाड, वनिता बकरे यांनी विविध खेळांचे पंच म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.