BNR-HDR-TOP-Mobile

kalewadi : काळेवाडीसह ठिकठिकाणी औषध फवारणी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – काळेवाडी नढे नगर प्रभाग क्रमांक 22 मध्ये स्वछता अभियान, डेंग्यू जनजागृती आणि आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी हा उपक्रम काळेवाडी येथे घेण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी औषध फवारणी देखील करण्यात आली.

कालेवाडीतील तुकाराम नढे कॉलनी, फिनॉलेक्स कॉलनी, तापकीर मळा, राजवाडे नगर, पंचनाथ कॉलनी, सहकार कॉलनी, परिसर अश्विनी कॉलनी या भागात जिजामाता वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल यांच्या मार्फत डेंगूच्या आळ्याची आणि मलेरिया डासांची तपासणी करून औषध फवारणी करण्यात आली.

  • यावेळी स्विकृत सदस्य विनोद तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. यावेळी संतोष काशीद, कीटकनाशक विभागाच्या मलेरिया निरीक्षक आश्विनी सुकटे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे पाटील, कर्मचारी संदीप शिंदे, रमेश जगताप, विनोद धेंडे, सुनील वलगडे, परशुराम शिंदे आदी उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.