शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Kalewadi: घरासमोरील भिंतीच्या वादावरून 14 जणांनी केली महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : काळेवाडीमध्ये (Kalewadi) घरासमोरील भिंतीच्या वादावरून 14 जणांनी एका महिलेस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत पिडीत 23 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी दिपक मिस्त्री (वय 36 वर्ष, रा. विजयनगर), राजेश मिस्त्री (वय 38 वर्ष), विद्याधर मिस्त्री (वय सांगता येत नाही), नाना पाटील (वय 55 वर्ष), अक्षय पाटील (वय 30 वर्ष), रामा मिस्त्री (वय 36 वर्ष) बाबू मिस्त्री (वय 36 वर्षे) तसेच महिला आरोपी (वय 52 वर्ष, वय 32 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 23 वर्ष) या आरोपीं विरोधात भादवी कलम 323, 143, 147, 149, 341 अन्वये वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Election Commission : मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

फिर्यादीच्या मावशीच्या शेजारी घरासमोरील भिंतीच्या (Kalewadi) वादावरून फिर्यादीच्या मावशीसोबत वरील आरोपी हे भांडण करत असताना फिर्यादी त्याचा व्हिडिओ काढत असताना आरोपी दिपक मिस्त्री याने फिर्यादीला ढकलल्यामुळे त्या व त्यांचा मोबाईल खाली पडला. त्यानंतर इतर आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. तसेच, आरोपी अक्षय पाटील याने फिर्यादीच्या नाकावर बुक्का मारल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त आले व दुखापत झाली आहे. आरोपी दिपक मिस्त्री याने फिर्यादीच्या पोटात लाथ मारली व आरोपी स्त्रियांनी त्यांचे केस ओढले होते. या प्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत.

Latest news
Related news