Chinchwad : विशेष चमक दाखविणार्‍या खेळाडूंच्या भावी कारकिर्दीसाठी कमला शिक्षण संस्था खंबीरपणे उभी – डॉ. दीपक शहा

एमपीसी न्यूज – विशेष चमक दाखविणार्‍या खेळाडूंच्या भावी कारकिर्दीसाठी संस्था खंबीरपणे उभी राहिल, असे मत कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा महाविद्यालयाच्या विविध शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडास्पर्धेत नुकतेच यश संपादन केले. अशा खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड, प्रा. पांडुरंग इंगळे समवेत विविध खेळात चमक दाखविणारे खेळाडू उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन फूटबॉल मुलींच्या स्पर्धेत प्रतिभा महाविद्यालयाच्या संघाने तिसरा क्रमांक वरिष्ठ विभागात पटकाविला. आंतर विभागीय मुलींच्या फूटबॉल स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या अमिशा सोनार, अंजुम शेख, आरती बहेनवाल, भक्ती पटेल यांची निवड करण्यात आली. मुलांच्या फूटबॉल स्पर्धेसाठी प्रतिक होस्मानी याची निवड झाली. बास्केटबॉल स्पर्धेसाठी भक्ती पटेल, धनुर्विद्या स्पर्धेसाठी अर्चना सोनावणे हिची निवड झाली.
मुलींच्या विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत प्रतिभा महाविद्यालयाचे तिसरा क्रमांक पटकाविला. त्या स्पर्धेत आरती बहेनवाल व अंजूम शेख यांची आंतरविभागीय क्रिकेट मुलीच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पुणे येथे नुकतीच विद्यापीठाच्या आंतरविभागीय मुलीच्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यात पुणे जिल्हा संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. आरती बहेनवाल हिने तीन सामन्यात दहा बळी घेऊन उत्कृष्ठ गोलंदाजीचा किताबही पटकाविला. तिची कामगिरी पाहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली.
आंतर महाविद्यालयीन मुलाच्या क्रिकेट स्पर्धा लोणावळा येथे झाल्या त्यात प्रतिभा महाविद्यालयाने (वरिष्ठ विभाग) या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत 93 संघाचा सहभाग होता. त्या प्रतिभा महाविद्यालतील विराज जमदाडे, रोहित शिंदे यांची निवड आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यालयाचे शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक डॉ. आनंद लुंकड, प्रा. पांडुरंग इंगळे यांनी दिली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.