Kamgar Sanghatana : फोटो काढला म्हणून पुण्यात कामगार संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण

एमपीसी न्यूज – नवरात्रीचा कार्यक्रम सुरु असताना आमचे फोटो का काढले म्हणून श्रमिक हक्क आंदोलन या कामगार संघटनेच्या (Kamgar Sanghatana) अध्यक्षाला 100 ते 150 जणांनी हाताने व खुर्च्याने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार वारजे येथील काळुबाई मंदिर परिसरात 30 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला.

याप्रकरणी युवराज बगाडे (वय 44 रा.शनिवारपेठ, पुणे) यांनी शनिवारी (दि.1) उशीरा वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात 100 ते 150 लोक व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे श्रमिक हक्क आंदोलन या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. फिर्यादी यीं काळुबाई मंदिर परिसरात एक मिटींग होती. ही मिटींग संपल्यानंतर मंदिर परिसरात नवरात्र उत्सव चालू होता. त्याचे फिर्यादी यांनी फोटो काढले.

यावेळी आरोपी महिला व इतर 100 ते 150 लोक तिथे जमा झाले व त्यांनी आमचे फोटो का काढले (Kamgar Sanghatana) म्हणत फिर्यादी व त्यांचे सहकारी महिला व मंकरंद पवार यांना हाताने व खुर्च्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा फोन हिसकावून घेतला. यावरून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.