Kamran Akmal On Dhoni: धोनी भारताचा आजवरचा सर्वांत प्रतिभावान यष्टीरक्षक व फलंदाज- कामरान अकमल

Kamran Akmal On Dhoni: Dhoni India's most talented wicketkeeper and batsman to date - Kamran Akmal पाकिस्तानात आमच्या तोंडचा घास पळवून न्यावा तशी त्याने क्रिकेट मालिका भारताला जिंकवून दिली होती.

एमपीसी न्यूज – धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वांत प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेटर कामरान अकमल यांनी दिली आहे. धोनीबद्दल बोलताना त्याने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

अकमल म्हणाला, धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वांत प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये त्याची धावा करण्याची सरासरी 50 पेक्षा अधिक आहे. त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. पाकिस्तानात आमच्या तोंडचा घास पळवून न्यावा तशी त्याने क्रिकेट मालिका भारताला जिंकवून दिली होती.

धोनीच्या नेतृत्व कौशल्याबद्दल बोलताना अकमल म्हणाला, धोनीची प्रतिभा अविश्वसनीय आहे. T20 विश्वचषक, आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली त्याच्या हाताखालील संघाने सर्व प्रकारच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी हा खरंच एक अप्रतिम खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये धोनीसारखे खेळाडू कमीच पाहायला मिळतात, असे अकमल म्हणाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर धोनी हा नशीबवान कर्णधार होता असे म्हणाला होता. तसेच 2011 च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. कारण संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते.

गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. पण धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला”, असे मत माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले होते.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने यावर प्रतिक्रिया देताना असे म्हंटले की, सौरव गांगुलीने देशाला अनेक मॅच-विनर खेळाडू दिले हे गंभीरचं म्हणणं योग्य आहे. पण धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर त्याचंही काम खूप कठीण होतं.

कारण सगळ्याच अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना शांतपणे हाताळण्यासाठी धोनीसारख्या कर्णधाराचीच गरज होती. त्याने संघातील साऱ्या खेळाडूंना नीट पद्धतीने हाताळले आणि संघ भक्कम केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.