Kamshet : संचारबंदीच्या आदेशाचे पालन न करणा-या कामशेतमधील 13 जणांना न्यायालयाचा दणका

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 36 जणांवर आज, सोमवारी (दि. 6) पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर 72 वाहने जप्त केली आहेत. त्यातील 16 जणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. त्यात कामशेत येथील 13 आहेत. तर तिघेजण भोर येथील आहेत.

कामशेत पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या 13 जणांपैकी दत्तात्रय भगवार बोईसने, अजित कुंडलिक वावरे, सचिन सखाराम चवरे, विश्वनाथ राघु दळवी यांना वडगाव न्यायालयाने 500 रुपयाचा दंड अथवा एक दिवसाची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

अशपाक फकीर नालबंद याला 200 रुपयांचा दंड अथवा दोन दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सुरज बबन चोपडे, अविनाश अंकुश तोंडे, राज महंमद बाबुलाल, नसीम नईम मोहम्मद, अंकुश गणपत ठोंबरे, देवराम महादु शिंदे, नजीम नवाब शेख, सुहास काळुराम खापे यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अथवा सात दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

भोर पोलिसांनी लहू गोविंद तुपे, संतोष गोपाळ तुपे, सुरज बाबुराव पेटकर या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भोर यांनी या तिघांना एक हजार रुपये दंड अथवा एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.