Kamshet : घोणशेत येथील आपत्तीग्रस्त कुटुंबांना सुनील शेळके यांच्याकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील घोणशेत येथील वनखात्याच्या तळ्याचा बंधारा फुटून घरात पाणी शिरलेल्या आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना भाजपचे युवानेते आणि तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी मदतीचा हात दिला.

मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे घोणशेत येथील वनखात्याच्या तळ्याचा बंधारा फुटून गणपत कदम व राम कदम या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. घरातील सर्व सामान वाहून गेल्यामुळे या परिवारांवर मोठे संकट कोसळले होते.

  • घटनेचे वृत्त समजताच सुनील शेळके यांनी तातडीची मदत म्हणून धान्य, किराणामाल, आंथरूण-पांघरूण अशा जीवनावश्यक वस्तू पाठवून आपत्तीग्रस्त कदम कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

सुनील शेळके यांच्या वतीने नारायण मालपोटे, सनी आसवले, अजिंक्य आसवले, सुजित सातकर, अंकुश खरमारे यांनी कदम कुटुंबापर्यंत ही मदत पोहचवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.