BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet: विजेच्या धक्क्याने एक कामगार जखमी

215
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – शहरातील आदर्श कॉलनी येथे इमारतीचे काम सुरू असताना विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरचा शॉक लागून एक कामगार भाजला असून उपचारासाठी त्याला कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. २२) रोजी कामशेत शहरामधील आदर्श कॉलनी येथे इमारतीचे बांधकाम चालू आहे. याठिकाणी रशीद शेख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्लॅब बांधण्याचे काम सुरू होते. याठिकाणी स्लॅबमध्ये सळई भरण्याचे काम सुरू असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जमील हुसेन शेख (वय ५०, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) याच्या हातातील सळई सुमारे २-३ फुटावर असलेल्या थ्री फेज एसटी लाईनला लागून शॉक बसल्याने जमील सुमारे ७० टक्के भाजला. त्याला तातडीने उपचारासाठी महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी याठिकाणी एसटी लाईनवर संरक्षक कवच म्हणून पाईप फिटिंगचे कव्हर बसवण्यात आले असताना देखील याठिकाणी शॉक बसल्यामुळे आणि विद्युत लाईन खाली बांधकाम करण्याची परवानगी दिल्यामुळे लोकांमधील एमएसइबीच्या अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासन याच्या कार्यशमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.