Kamshet : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात मतदानासाठी निघालेल्या तिघांचा मृत्यू; 16 जण जखमी

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. बस मधील बहुतेक प्रवासी हे मुंबईहून पाटसला मतदानाकरिता निघाले होते.

सयाजी पांडुरंग पाटील (वय 65), संभाजी शिवाजी पाटील (वय 45) ( दोघेही राहणार वझोळी, ता. पाटण, सातारा ), मोहनकुमार शेट्टी (वय 42, रा. वांगणी, बदलापूर, ठाणे ) या तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला. तर बाबासो पांडुरंग पाटील (वय 51), सुवर्णां बाबासो पाटील (वय 45), गणेश अरुण पाटील (वय 25), सुरज आनंदराव पाटील (वय 27), शैलेश हनुमंत पाटील (वय 33), अनिल मधुकर पाटील (वय 37), जयसिंग खाशाबा पाटील, विश्वनाथ तुकाराम पाटील (वय 45), आकाश जयाईनग पाटील (वय 25), भिवाजी चंदू पाटील (वय 55), विशाल किसन पाटील (वय 27), तुकाराम सावळाराम भिंगारदिवे (वय 44), मंगल जयसिंग पाटील (वय 44), शंकर थोरात (वय 44), राणी मंगेश देसाई (वय 24, सर्वजण रा. वाझोळी, ता. पाटण, सातारा व बसचा चालक हे जखमी झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मौजे बौर गावाच्या हद्दीत किलोमीटर 74/600 जवळ मुंबई पुणे लेनवर टायर फुटलेला ट्रक (केए 23 ए 7740) हा रस्त्याच्या साईटपट्टीवर उभा होता. यावेळी मुंबईहुन कोल्हापूरकडे जाणारी भवानी ट्रॅव्हलची बस (एमएच 09 बीए 3096) धडकून भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे सोळा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

बस मधील बहुतेक प्रवासी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या बसने गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.