Kamshet : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात दोघांचा मृत्यू; चौघे जखमी

एमपीसी न्यूज – कामशेत हद्दीतील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दर्शन ढाब्यासमोर गुरुवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास मुंबईकडे वेगात निघालेल्या कारला भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू दोन झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आहे.

गुरुवारी सायंकाळी पुण्याकडून मुंबईकडे वेगात निघालेली स्वीफ्ट कार (एमएच १२ टीवाय ७८६४) कामशेत हद्दीतील महामार्गावरील कामशेत खिंड उतरत असताना कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार मुंबई लेनच्या डिव्हायडरला धडकून पुणे लेनवरून पुण्याकडे निघालेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केयन ९८८९) या कारच्या बोनेटवर येऊन पडली.

  • या अपघातात स्वीफ्ट कार (एमएच १२ टीवाय ७८६४) मधील मनोज मल्लप्पा प्याटीस (वय २८ रा. शांतीनगर ,येरवडा पुणे) आणि तेजस प्रकाश सोनवणे (वय २३, लोहियानगर पुणे) या दोघांचा मृत्यू झाला असून अक्षय विलास खाजगे (वय २३, रा. शांतीनगर येरवडा,पुणे), राम हनुमंत दुब्बल (वय २०, रा. शांतीनगर येरवडा ,पुणे), चालक पक्षुराम कृष्णय्या कोळी (वय २३, रा. ताडीवाला रोड पुणे) हे तिघे गंभीर जखमी झाले.

पुणे लेनवरील स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केयन ९८८९) या कारमधील चालक रोहित नंदकिशोर दोडकेकर (वय ३१, रा.रहाटणी काळेवाडी) हे जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. या अपघातातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी पाटील व पोलीस हवालदार संतोष शिंदे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.