Kamshet : द्रुतगती मार्गावर बसची कंटेनरला भीषण धडक; बसचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत शहराजवळ बौर गावाच्या हद्दीत कंटेनर लेन सोडून चालला असता अचानक बंद पडला. यावेळी कंटेनर पाठीमागून येणाऱ्या बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे.

रमेश संजय कबाडे (वय २४ रा. म्हाडा, सोलापूर) असे मयत बसचालकाचे नाव आहे. तर, मौहमद सइद खान (रा. अब्दुल्ला नगर,शहाबाद, हरियाना) असे जखमी क्लिनरचे नाव आहे.

याबाबत कामशेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत हद्दीतील बौर गावच्या किलोमीटर नं. ७३/९२५ जवळ रविवारी (दि. २२) सकाळी ५.१५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास चेन्नईकडून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (एच आर ५५ ए डी ३९२८) हा चुकीच्या लेनने चालला होता. त्यात हा कंटेनर रस्त्यात अचानक बंद पडला.

यावेळी पाठीमागून येणाऱ्या अक्कलकोट-मुंबई या लक्झरी बस (एम एच ०३ सी पी ९९०३)ने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालक रमेश संजय कबाडे याचा मृत्यू झाला असुन बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनर चालकाचे नाव मौहमद सइद खान आहे. जखमीवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.