Kamshet Crime News : 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – कामशेत येथील 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल व 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग, कामशेत खिंड येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि.12) ही कारवाई केली.

प्रतीक अर्जुन निळकंठ (वय 21 वर्ष रा. कामशेत, ता.मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 2 गावठी पिस्तुल 2 जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा एकुण 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत येथील एका युवकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने कामशेत गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गाच्या कामशेत खिंडीतील मोकळ्या जागेत सापळा रचुन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी प्रतिक याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 02 गावठी पिस्टल व 02 जिवंत काडतुसे व 01 मोबाइल असा मुद्देमाल मिळून आला आहे. यापूर्वीही अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, सुनिल जावळे, सचिन गायकवाड, मुकुंद आयचीत, पोलीस नाईक गुरु जाधव व प्राण येवले यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.