Kamshet Crime News : पेट्रोल पंपावर खासगी बसमधून 48 लाखांची चोरी

एमपीसीन्यूज : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एचपी पेट्रोल पंपावर लघुशंका करण्यास उतरलेल्या इसमाच्या जवळील सुमारे 19  लाख 85 हजार रुपयांची रोख रक्कम व 744 ग्रॅम वजनाचे सोने, असा एकूण 48 लाख हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला.

या प्रकरणी जगन्नाथ रघुनाथ पुरिया ( वय 30, रा. ए 203, अमोघसिद्धी सोसायटी रेती बंदर रोड, डोंबिवली-वेस्ट) यांनी कामशेत पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोरिया हे एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी (दि.3) सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताजे गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपावर त्यांची बस थांबली. यावेळी फिर्यादी लघुशंका करण्यासाठी बसमधून उतरले. हीच संधी साधून चोरटयांनी त्यांची बॅग चोरून नेली.

या बॅगेत 19  लाख 85 हजार रुपयांची रोख रक्कम व 744 ग्रॅम वजनाचे सोने, असा एकूण 48 लाख हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल कदम हे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.