Kamshet Crime : कामशेत गोळीबार प्रकरणात तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ

एमपीसी न्यूज : कामशेत गोळीबार (Kamshet Crime) प्रकरणातील 3 आरोपींना आज वडगाव मावळ कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांनी दिली. अधिक माहिती देताना, पवार म्हणाले, की कामशेत गोळीबार प्रकरणात एकूण 4 आरोपी आहेत.

रुपेश वाघोले, (वय 30 वर्षे, रा. शिरगाव जवळ, एस पोल्ट्री फार्मजवळ वाधालेवस्ती, तालुका मावळ), लहू काळे (वर्षे 34, रा. सांगूरडी तालुका खेड), अमोल भेगडे (वय 38 वर्षे, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ), गोपाळ उर्फ अप्पा गायके (वय 47 वर्षे, रा. कामशेत) हे चार आरोपी आहेत. याबाबत पोलिस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे सचिन घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम 201, 202, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25(1एए), 27 अंतर्गत कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 जून रोजी रात्री 9.36 वा कामशेत गावाच्या हद्दीत वाडीवळे गेट जवळील रुचिरा हॉटेलच्या मोकळ्या जागेत गोळीबार झाला होता. आरोपी रुपेश वाघोले याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बाकीच्या तीन आरोपींमध्ये चर्चा चालू होती. चर्चा चालू असताना रुपेश वाघोले याने प्रभाव पडण्यासाठी त्याच्या कमरेला लावलेली बेकायदेशीर बिगर परवाना असलेले पिस्टल काढले. त्यावेळी लहू काळे व अमोल भेगडे यांनी वाघोलेला उत्तेजन दिल्याने त्याने जोषमध्ये येऊन हातात असलेल्या पिस्टलने हवेत फायर केले.

Pune Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, 20 किलो गांजा जप्त

या गोळीबारसंदर्भात (Kamshet Crime) आरोपी गोपाळ गायके यांना पोलिसांनी विचारपूस केली, तेव्हा सांगितले की हॉटेलवर हा प्रकार घडल्यानंतर फायरिंग करणारी मुले निघून गेली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये बंदुकीची पुंगळी पडली होती, ती टाकून दिली व घडलेला प्रकार कोणालाही सांगितले नाही. हॉटेलचा मालक गोपाळ उर्फ अप्पा गायके याने त्याच्या हॉटेलवर घडलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत पोलिस ठाण्याला माहिती देणे आवश्यक असूनही कोणतीही माहिती न देता गंभीर गुन्ह्याचा प्रकार लपवून ठेवला. तसेच गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावाही नाहीसा केला. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

पवार पुढे म्हणाले, की सर्व चार आरोपींना शनिवारी 24 जूनला अटक करण्यात आली. त्यांना वडगाव मावळ कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. आज 26 जूनला वडगाव मावळ कोर्टाने गायके यांना सोडून इतर तीन आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.