Kamshet : देवा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000 महिलांना मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन

एमपीसी न्यूज – युवानेते देविदास तथा देवा अनंता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील 5,000 महिलांना मोफत त्र्यंबकेश्वर (नाशिक) दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पै. देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराने दोन फेब्रुवारीला त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रा आयोजित केली आहे. कामशेतजवळील नायगावच्या हिरकणी लॉन्स रिसोर्ट येथून सकाळी साडेआठ वाजता त्र्यंबकेश्वर यात्रेचे प्रस्थान होणार आहे.

अशा प्रकारच्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. यापूर्वी 2018 मध्ये कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या. 2019 मध्ये शिर्डीला साईबाबा दर्शन यात्रा काढण्यात आली होती. तिचा लाभ पाच हजार महिलांनी घेतला होता. यावर्षी देखील नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेसाठी सुमारे शंभर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांना चहा, अल्पोपहार व भोजनही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.