Kamshet : आमदार शेळके यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना धान्य आणि खाद्यतेल वाटप; 350 कुटुंबांना मिळाला लाभ

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला जाग आल्याने आदिवासी कातकरी कुटुंबाला हक्काचे धान्य मिळाले. : Distribution of food grains and edible oil to tribal families by MLA Shelke; 350 families benefited

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबाला कामशेत येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या आवारात मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते शुक्रवार (दि.7) दुपारी धान्य व खाद्यतेल वाटप करण्यात आले.

याप्रसंगी  वरिष्ठ आदिवासी निरीक्षक विजय देशपांडे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उपप्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी पिंगळे, मुख्याध्यापिका अनिता देवरे, संजय शिंगाळे, माजी सरपंच तानाजी दाभाडे, गजानन शिंदे, रोहिदास वाळूंज, धनंजय वाडेकर, निलेश दाभाडे, विक्रम बाफना, संजय माझिरे, रोहिदास वाळुंज व आदिवासी कातकरी व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबाला 20 किलो तांदुळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने एक किलो खाद्यतेल वाटप करण्यात आले.

प्रातिनिधिक स्वरुपात 350 कुटुंबाला आज वाटप केले असून उर्वरित लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.

‘कोरोनामुळे आदिवासी जनतेचा उत्पन्नाचा स्त्रोत हिरावला गेला आहे. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी शक्य त्या सुविधा देण्यासाठी नेहमीच कार्यरत आहे’ असे आमदार शेळके यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबाचे धान्य वाटप मागील दोन महिन्यांपासून रखडले होते. आमदार शेळके यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्याकडे पाठपुरावा केला.

अखेर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला जाग आल्याने आदिवासी कातकरी कुटुंबाला हक्काचे धान्य मिळाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.