Kamshet : अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवर बौर गाव हद्दीतील घटना

एमपीसी न्यूज – बौर गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी रात्री साडेनऊ वाजल्याचे सुमारास झालेल्या ट्रक अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. २०)रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती  मार्गावरून मुंबई कडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक (एमएच ४५ बीबी ९०३८) बौर गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून जात असताना ट्रकला पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिल्याने ट्रक द्रुतगती मार्गालगतच्या खड्यात जाऊन पलटी झाला.

  • या अपघातात ट्रक चालक तुषार जगन्नाथ मोरे (वय ३० रा. ता. पुरंदर,पुणे) हा गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी दुपारी ट्रकचालक तुषार मोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघातनंतर ट्रकमधील पत्र्याचे रोल द्रुतगती मार्गावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.