Kamshet : द्रुतगती मार्गावर कुरिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट

एमपीसी न्यूज- पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदयाच्या पुढे कुरिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत ट्रक आणि आतील सामान पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमआरडीए अग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी विजय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने कुरिअर घेऊन येत असलेल्या ट्रकला (एम एच 48 टी एस 5311) अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमध्ये लागलेली आग मागील बाजूस पसरल्यामुळे ट्रकमधील कुरिअर सामान पेटले.

सकाळी साडेसहाला या घटनेची वर्दी मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. ट्रकची डिझेल टाकी तापलेली असल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी टाकीवर पाण्याचा मारा करून कुलिंग केले. त्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान मार्गाच्या कडेला असलेल्या ओढ्यामधून देखील पंपाच्या साहाय्याने पाणी उपसून आग विझवण्यात आली. गाडीचे इंजिन गरम झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.