Kamshet : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी मावळ तालुक्यातील सांगिसे येथे घडली.

सुप्रिया राहूल ढवळे (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी सुप्रियाचे वडील भरत दत्तू जाधव (रा. महागाव) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विवाहितेचे पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास सुप्रिया यांनी साडीने गळफस घेऊन आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, असे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार,पोलिसांनी पती, सासू, सासरे, जाऊ आणि दिराला ताब्यात घेतले आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like