Kamshet: माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून व कामशेत ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य श्री अभिमन्यू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काटकर व मावळ तालुका महिला युवती आघाडीच्या उपध्यक्षा ज्योती तानाजी काटकर यांच्या प्रयत्नातून कामशेत माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

त्यावेळी कामशेतच्या सरपंच रुपालीताई शिनगारे व माजी सरपंच सारिकाताई शिंदे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मोरमारे सर व माऊलीनगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.