BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet : चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस टँकर टेम्पोवर आदळला; दोघे गंभीर जखमी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – गॅस टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंड येथे तो दुसऱ्या लेन मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोला धडकला. यात टेम्पोचालक आणि एकजण गंभीर जखमी झाले असून टँकरचालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. यातील जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जूना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडच्या उतारास पुणे बाजूकडे जाणाऱ्या टँकर (जीजे ०१ एच डी ६५८५) चालकाचे तीव्र वळणावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून टँकर डिव्हायडर तोडून पलिकडील लेनवर मुंबई बाजूकडे जाणाऱ्या छोटा मालवाहतूक टेम्पो (एमएच १४ जी यु ८६४५) वर जोरात आदळून उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. १२) रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास झाला. मालवाहतूक टेम्पोमधील एक आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर टँकरचालक आणि क्लीनर हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना कामशेत मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

  • भीषण अपघात
    हा अपघात इतका भीषण होता कि, टेम्पोचा पूर्ण चुराडा झाला. दोन्ही वाहने एकमेकात अडकली होती. टेम्पोचालक वाहनात अडकला होता. त्याला काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. यावेळी नागरिक यांना सहकार्य घ्यावे लागले. अपघातानंतर या लेनवर सुमारे दोन तास वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत जखमींना बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.