Kamshet : ‘कोरोना जनजागृती अभियान’ राबवून विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – कामशेत येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्र आणि स्मित कला रंजन कामशेत यांच्या वतीने ‘कोरोना जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. रमेश कुमार तुलसानीया विद्यालय जिल्हा परिषद शाळा नं 1 आणि शाळा नं 2 जिल्हा परिषद शाळा पंचशील कॉंलानी येथे ‘कोरोना जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या आजाराची लक्षणे सांगताना सर्दी, खोकला, ताप, श्वसन प्रक्रियेत त्रास होत असेल तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे. तसेच हा आजार होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गार पाणी, थंडपेय, आईसक्रीम तळलेले पदार्थ याचे सेवन करणे टाळावे, अर्धवट कच्चे शिजलेले अन्न खाऊ नये, प्राण्यांचा संपर्कात राहू नये, उघड्यावर थूंकू नये, बाहेरून आल्यावर अथवा शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने धूणे, शिंक व खोकला आल्यावर तोंडावर रुमाल किंव्हा हात ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.

अशा प्रकारची काळजी घेणे, अशी माहिती दिली आहे. तसेच अधिक माहिती हवी असल्यास 104 टोल फ्री क्रमांकावर फोन करणे किंवा पुणे नियंत्रण कक्ष 020-262127394 यांच्याशी संपर्क करणे, अशी माहिती डाॅक्टर अनिल गिरी आरोग्य सहाय्यक डी.सी राऊत आणि हनुमंत घोडके यांनी दिली.

यावेळी संस्थेचे संस्थापक शिवानंद कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संतोष वंजारी, योगेश देसाई, विपुल जाधव, सचिन कांबळे व संतोष राक्षे यांनी केले सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.