BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet : इंद्रायणी अपंग संस्थेच्या दिव्यांग वधू-वर सूचक मेळाव्याचा 150 जणांनी घेतला लाभ

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- इंद्रायणी अपंग संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी नुकताच आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर सूचक मेळाव्यात 150 दिव्यांग बंधू-भगिनींनी लाभ घेतला.

या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभागाचे अधिकारी श्रीराम सिदधपाठकी, संजीवनी बगाडे, विजया दाभणे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष बंडाभाउ ठाकर, दीपालीताई तेलंग, सामाजिक कार्यकर्ते दत्ता काजळे, प्रकाश थोरवे उपस्थित होते. या मेळाव्याचा 150 दिव्यांग बंधू-भगिनींनी लाभ घेतला.

यावेळी झालेल्या मार्गदर्शन सत्रामध्ये शिक्षण, रोजगार, विवाह, शासकीय योजना याबाबत दिव्यांगाना मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांग बांधवांचे विवाहासाठी परिचयपत्रे संकलित करून काही विवाह निश्चित करण्यात आले. तर उर्वरीत विवाहइच्छुकांचे माहिती संकलनांच्या आधारे विवाह निश्चित करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची तसेच दिव्यांगासाठी संस्थेचे काम सातत्याने चालू ठेवणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सतीश ढमाले यांनी दिली.

सुत्रसंचालन अंबादास गर्जे यांनी तर आभार तळेगावकर यांनी मानले. कायर्क्रम यशस्वी करण्यासाठी पी.के. सिंह, सुनील गुजर, वासुदेव लखीमणी,चंदू लामगण, महादू पानसरे, गुलाब कोंढरे, अनिल वांळुज, वासुदेव लाखिमले, सुभाष शेडगे, गुलाब परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

.

HB_POST_END_FTR-A1
.