Kamshet : कुंभार समाजाच्या मातीकला बोर्डाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- युती सरकारच्या काळात कुंभार समाजाच्या मातीकला बोर्डाला मान्यता मिळाली होती. आत्ता सत्ता बदलली असली तरी बोर्डाच्या अंमलबजावणीसाठी आपण शासकीय पातळीवर प्रयत्न करु असे आश्वासन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिले. कामशेत येथे मावळ तालुका कुंभार समाज आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नितीन भागवत होते. यावेळी मावळ पंचायत समितीच्या सभापती निकीता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रदेश कुंभार समाजाचे अध्यक्ष सतीश दरेकर, पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, माजी सभापती सुवर्णा कुंभार, प्रदेश युवा अध्यक्ष बाळासाहेब शिवलीकर, सतीश पाषाणकर, बाबाजी कुंभार, भगवान कुंभार, अर्जुन कुंभार, राजेंद्र जाधव, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ पांडुरंग कार्लेकर गुरुजी, प्रकाश राजकर, मावळ तालुका कुंभार समाज अध्यक्ष तानाजी दरेकर, सरचिटणीस संतोष गा कुंभार, महिलाध्यक्षा शुंभागी दरेकर, अशोक जाधव, नामदेव कुंभार, सुरेश शिवणेकर, रामचंद्र हाडशीकर, जयंत कुंभार, शिवाजी कुंभार आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी वडगाव मावळ येथील आचार्य आयुर्वेद फांऊडेशनचे संस्थापक डॉ रवींद्र आचार्य यांना श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुरस्कार तसेच मावळ समाज भूषण पुरस्कार बबनराव जामदार यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी समाजातील विद्यार्थ्यांचा, कुशल कारागिरांचा, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन माजी अध्यक्ष अमित कुंभार यांनी केले तर संयोजन जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष तानाजी दरेकर, युवा अध्यक्ष मकरंद कुंभार, व पदाधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.