Kamshet : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त कामशेत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे यांचा कामशेत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळी कामशेत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे, युवा नेते विशाल लोखंडे, माऊली शिंदे, संकेत ढवळे, रोशन शिंदे, ओंकार शिंदे, अमोल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कामशेत शहरातील महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यात आली. शाळा, कॉलेज, भाजी मंडई आठवडे बाजार, महिला काम करत असलेल्या कंपनी आदी ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेच्याबाबतीत स्थानिक महिलांना सोबत घेऊन गस्त घालण्यात यावी व महिला सुरक्षा कमिटी बनवावी अशा प्रकारची मागणी त्यावेळी करण्यात आली.

कामशेत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे ह्यांनी महिला सुरक्षितेत वाढ करून त्याबाबत दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची खबरदारी घेतली जाईल असे सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.