Kamshet: करुंज व बेडसे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ‘श्रीगणेशा’

Kamshet: MLA Sunil Shelke inaugurates tap water supply scheme in Karunj and Bedse villages या पाणी योजनेमुळे करुंज बेडसे गावातील लोखंडवाडी, दहीभातेवस्ती, ठाकरवाडी, तिखेवस्ती आदी भागातील सुमारे 2,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

एमपीसी न्यूज- कामशेत शहराजवळील करुंज व बेडसे गावात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुमारे 1 कोटी 93 लाख खर्च करून गावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामास गुरुवार (दि. 2) रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते टिकाव मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता अरविंद चाटे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सरपंच सदाशिव शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी शिंदे, सुरेखा राऊत, स्वाती पवार, कल्पना कांबळे, चंद्रकांत दहिभाते, संतोष लगड, अर्जुन शेंडगे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाणी योजनेमुळे करुंज बेडसे गावातील लोखंडवाडी, दहीभातेवस्ती, ठाकरवाडी, तिखेवस्ती आदी भागातील सुमारे 2,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल. असे यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.