Kamshet : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इसमाला अटक

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ गाठून तिला मोबाइलवरून अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) कामशेत गावच्या हद्दीमध्ये दत्त कॉलनी येथे घडली.

मजहर अबरार बांगी (रा दत्त कॉलनी कामशेत ता मावळ जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. दबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या मुलीला तिच्या घराजवळ गाठून आरोपी बांगी याने तिला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवली आणि खोलीत चालण्यास सांगून मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला, असे फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम एस गायकवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.