Kamshet News : पार्थ पवार, मदन बाफना व बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य किटचे वाटप

एमपीसीन्यूज :  राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी  आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.  दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बबनराव भेगडे व मदन बाफना या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

पार्थ पवार  व बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसा  निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष मारुती ऊर्फ छबुराव भेगडे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य किटचे वाटप करण्यात येत आहे. नाणे माध्यमिक विद्यालय नाणे (ता.मावळ) या शाळेत आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, कफ सिरप अडुळसा, सर्दी, ताप, अंगदुखीवरील टॅब्लेटस, मल्टिव्हिटॅमिन गोळ्या, सी व्हिटॅमिन गोळ्या, रोगप्रतिकारक शक्ती,  हिमोग्लोबिन वाढविण्यासह हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या व साबण आदी साहित्याचे मुलांना वाटप करण्यात आले.

संतोष भेगडे यांनी हा अनोखा उपक्रम राबविल्यामुळे पालक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच सर्व शिक्षक वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.