Kamshet News : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सुमारे 300 नवीन पथ विक्रेत्यांची नोंदणी

एमपीसीन्यूज : कामशेत शहरात भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, माजी उपसरपंच गणपत शिंदे यांच्या प्रयत्नातून व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयोजित मेळाव्यात तीनशे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तसेच वीस लाभार्थी पथ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले.

पथ विक्रेते योजना तसेच तरुणांना दहा लाखापर्यत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी कामशेत येथील श्री गणेश मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक सुनील अहिवळे, जि.प.सदस्य अलक धानिवले, माऊली शिंदे, राजाराम शिंदे, श्याम राक्षे, शंकर शिंदे, सुवर्णा कुंभार, विजय शिंदे, विकास लिंबोरे, नामदेव वारंगे, नामदेव शेडगे, देवा गायकवाड, संतोष कदम, नितीन गायखे, वसंत काळे, सारिका घोलप, सारिका शिंदे, सुभाष गायकवाड, अंकुश तोंडे, रमेश बच्चे, गणपत बेनगुडे, प्रफुल गदिया,जनाबाई पवार, काशिनाथ येवले, श्रीहरी गायकवाड, शंकर काजळे, बबलु सुर्वे, संजय लोनकर, शंकर पिंगळे, प्रसाद उंडे आदी उपस्थित होते.

यावेळी वीस लाभार्थी पथ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तरुणांनी व्यवसायाकडे वळावे आणि आपली प्रगती करावी यासाठी विविध कर्ज योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक पक्षाचे कामशेत शहर अध्यक्ष मोहन वाघमारे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.