Kamshet News : ‘हे’ आजोबा आहेत नातेवाईकांच्या शोधात

नातेवाईकांनी किनारा वृद्धाश्रमला संपर्क साधण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – घर आणि आप्तेष्ट यांच्याबद्दल जास्त माहिती आठवत नसणारे एक आजोबा नातेवाईकांच्या शोधात आहेत. पायाला इजा झालेल्या अवस्थेत हातात रिकामी बाटली घेऊन मुंबई – पुणे महामार्गावर पाणी मागत थांबलेल्या आजोबांना कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमाने मदतीचा हात दिला. दरम्यान, या आजोबांच्या नातेवाईकांनी वृद्धाश्रमाला संपर्क साधावा, असे आवाहन किनारा वृद्धाश्रमच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी केले आहे.

याबाबत वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आजोबा महाडचे रहिवासी असून ते रामचंद्र केसरकर, असे आपलं नाव सांगतात. त्यांना दोन मुले देखील आहेत. याव्यतिरिक्त त्यांना इतर काहीच आठवत नसल्याचे त्या म्हणाल्या.

शुक्रवारी (दि. 26) किनारा वृद्धाश्रमाच्या निराधार शोध मोहिमेअंतर्गत हातात रिकामी बाटली घेऊन मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा येथे पाणी मागताना रात्री दहाच्या सुमारास ते आढळले.

या आजोबांची चौकशी केली असता त्यांना फारसं काही आठवत नव्हते. पायाला इजा झाली असल्याने त्यांना मदतीची गरज होती. त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं. तेथे त्यांच्या पायाला 10 टाके असून ते अद्याप काढले नाहीत असं समजले.

औषधोपचार केल्यानंतर सध्या ते वृद्धाश्रमात आहेत. आजोबांच्या संबंधित नातेवाईकांनी किनारा वृद्धाश्रमात ( 9373301655 )संपर्क साधावा, असे आवाहन प्रिती वैद्य यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.