Kamshet : द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव कारची धडक बसून एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रविवारी ( दि. 16 ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.

हरिचंद्र आफ्रीलाल यादव ( वय 39 रा. इंदिरा नगर ठाणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिचंद्र आफ्रीलाल यादव, लालचंद रमिराज यादव, मनोजकुमार यादव ( सर्व. रा. ठाणे ) हे ठाणे येथून मुन्ना यादव यांच्या चारचाकी मोटारीने पुण्यास जाण्यास निघाले होते.  पिंपळोली गावाच्या हद्दीत किलोमीटर नं. 67/200 जवळ गाडी रस्त्याच्या कडेला लावून पलीकडे असलेल्या मॉलकडे जाण्यासाठी हरिचंद्र यादव हे रस्ता ओलांडत होते.

त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या हुंदाई कारची ( क्र. एमएच 12 एल पी 1337 ) धडक बसून यादव गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. पुढील तपास महेंद्र वाळूंजकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.